Pune Police Loksabha Election Google
लोकसभा २०२४

Pune Loksabha Election: पुणे पोलिसांचा गावगुंडांना दणका; मतदानापूर्वी ९ हजार २५५ गुंडांची झाडाझडती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड

पुणे : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा उद्या १३ मे ला पार पडणार आहे. या टप्प्यात पुणे येथेही मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यानं यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथील पोलीस यंत्रणा सतर्क झालीय. मतदानाच्यावेळी पैसे वाटले जात असल्याच्या घटना घडत यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील ९ हजार २५५ गुंडांची झाडाझडती घेतलीय.

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या वेळी गुंडांचा वापर केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. यानंतर महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात येणार असल्याचा आरोप महायुती वरती केलाय. पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून शहरातील तब्बल ९२५५ गुंडांची झाडझडती घेतलीय.

कारवाई दरम्यान पुणे पोलिसांनी आर्म्स ऍक्टचे ७ गुन्हे दाखल करून आरोपींच्या ताब्यातून २ तलवार, ४ कोयते व १ सुरा जप्त केले आहेत. तसेच ११ आरोपींवर तडीपार आदेशाचे भंगा केल्याप्रकरणी कारवाई केलीय. यातील ६० जणांवर जामीनपात्र, अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलेत. शहरातील विविध पोलीस स्टेशनकडून नाकाबंदीदरम्यान ३ हजार १४४ संशयित वाहन चालकांची तपासणी करण्यात आलीय. त्यात ४४७ जणांवर कारवाई करत ३ लाख ८५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. वाहतूक शाखेकडून २ हजार ४९३ संशयित वाहन चालकांची तपासणी केली गेली. ४७३ जणावंर कारवाई करुन ४ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.

दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात पैसे वाटप केल्या जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. या संबंधित व्हिडिओदेखील रोहित पवारांनी एक्स या सोशल मीडियावर शेअर केला होता. रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वेल्हेतील जिल्हा मध्यवर्ती बँक ही रात्री १२ वाजता सुद्धा सुरू होती. मतदान असल्याने कदाचित बँका सुरू आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT