लोकसभा २०२४

Pune Lok Sabha 2024: प्रचाराचा शेवटचा टप्पा; आज पुण्यात सभांचा धडाखा; अजित पवार, सुप्रिया सुळे अन् देवेंद्र फडणवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात

Ajit Pawar and Supriya Sule Sabha: राज्यात आता चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सभांचं मॅरेथॉन रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Rohini Gudaghe

राज्यात तीन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. राज्यात आता चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये (Pune Lok Sabha 2024) महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सभांचं मॅरेथॉन रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आज सुप्रिया सुळे यांच्या पेठ आणि घोडेगाव येथे सभा पार पडणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीकडून सभांचा धडाखा पाहायला मिळत आहे. तर अजित पवार यांच्या शिरुरमधील केंदुर , शिरुर शहर, आणि न्हावरा या ठिकाणी सभा पार पडणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या आज पुण्यात दोन सभा पार पडणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात फडणवीस यांच्या जाहीर सभा होत आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाणेर परिसरात सभा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 8 वाजता पर्वती परिसरात सभा पार पडणार आहे.

बारामतीनंतर आता शिरुर लोकसभा मतदार संघात मँरेथॉन सभा धडका लागला आहे. आज सुप्रिया सुळे दोन तर अजित पवार तीन सभा घेणार आहे. शिरुरमधुन अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे. परंतु, प्रतिष्ठा मात्र दोन्ही पवारांची पणाला लागली आहे.

मागच्या वेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) कोल्हेंना सोबत घेऊन आढळराव पाटलांचा पराभव केला होता. यावेळी लढत तिच असली तरी राजकीय फासे मात्र उलटे पडले आहेत. यावेळी कोल्हेंचा पराभव अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यामुळे शिरुरमध्ये शरद पवारांनीही अमोल कोल्हेंच्या पाठीशी तगडी ताकद उभी केली आहे. यासाठी दोन्हीही बाजुने सभांचा धडका लागला आहे. दोन्ही बाजुने एकमेकांवर आरोपही केले जातात. आज सुप्रिया सुळे (Supriya Sule) कोल्हेंसाठी शिरुरच्या मैदानात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेतून दर महिन्याला मिळतील २०,००० रुपये; किती गुंतवणूक करायची? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

Happy Hormones कसे वाढवायचे? खाण्यात या ४ पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT