Prakash Ambedkar-Vasant More
Prakash Ambedkar-Vasant More  Saam TV
लोकसभा २०२४

Pune Politics : वसंत मोरे वंचितकडून लोकसभा निवडणूक लढणार?, आज प्रकाश आंबेडकरांची घेणार भेट

प्रविण वाकचौरे

सचिन जाधव | पुणे

Pune News :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे काही दिवसांपूर्वीत पक्षातून बाहेर पडले. मात्र अजूनही त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केलेले नाही. लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता सुरु आहे. वसंत मोरे आज वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत.

वसंत मोरे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र निवडणूक अपक्ष लढायची की कोणत्या पक्षातून लढवायची याची चाचपणी सध्या ते करत आहेत. वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. मुंबईमध्ये वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची ११ वाजण्याच्या सुमारास भेट होईल. (Maharashtra Loksabha Election 2024)

वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे कुठल्या पक्षात जाणार यावर अनेक चर्चा सुरू आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. आपण लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक असल्याचंही त्यांना सांगितलं होतं. मात्र महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर वंसत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.त्यामुळे वंचितकडून वसंत मोरे पुण्यातून निवडणूक लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची काल भेट झाली होती.

त्यानंतर पुण्यातील मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आता वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! ऐन निवडणुकीत रवींद्र वायकरांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?

IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

Today's Marathi News Live : नाशिकच्या मालेगावात ग्रामस्थांनी केला रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत

Relationship Tips: पार्टनर सतत करतोय या ५ चुका , तर वेळीच व्हा सावध

Amit Bagul On Pune MVA Poster | खासदार आमचा पक्का, अमित बागुल यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT