लोकसभा २०२४

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Maharashtra Election Voting : मुंबईसह विविध मतदारसंघात 5 व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत अनेक मतदान केंद्रांवर मोठा घोळ झाल्याची ओरड झाली होती. मतदानाच्या दिवशी झालेल्या या ढिसाळ कारभाराची सरकारनं गंभीर दखल घेतलीये..मात्र मतदारांना मनस्ताप सहन करावा लागलायं. तर डोंबिवलीत नागरिक थेट कोर्टात जाणारेत...पाहूया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात संथगतीनं झालेल्या मतदानावरून राजकारण पेटलंय. तब्बल तासाभरात केवळ आठ-ते दहा मतदार मतदान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळेच मुंब्रा,पालघर,नाशिक मतदारसंघात रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरु होतं. ज्या ठिकाणी विरोधकांना पराभवाची भीती होती त्या ठिकाणी सत्ताधा-यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदानाची गती कमी केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

तर मुंबईत अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर भोंगळ कारभार पाहायला मिळाला. तसंच मतदारांना तासंतास ताटकळत उभं राहावं लागलं. त्यामुळे उद्धव ठाकरे थेट मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी दाखल झाले. संतप्त ठाकरेंनी याला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप केला. तर पुरावे द्या असं आव्हान भाजपनं ठाकरेंना दिलं.

या प्रकाराला कल्याण-डोंबिवलीही अपवाद नव्हती. डोंबिवलीतला मतदानाच्या गोंधऴाचा वाद थेट मुंबई हायकोर्टात जाणार आहे.. डोंबिवलीतल्या तब्बल 50 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा आऱोप करण्यात आलाय...त्यामुळे डोंबिवलीकर हायकोर्टात धाव घेणार आहेत. या सर्व गोंधळाची अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेत मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT