PM Narendra Modi  Saam Tv
लोकसभा २०२४

Narendra Modi : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; PM मोदी पोस्ट करत म्हणाले, 'मला विश्वास आहे की...'

Lok Sabha Phase 7 Voting Narendra Modi Post : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच मोदींनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट केली आहे.

Satish Daud

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज शनिवारी होत आहे. एकूण ५७ जागांसाठी हे मतदान होत आहे. यामध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. या मतदारसंघातून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात होताच मोदींनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना भरभरून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये मोदी म्हणतात, "लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. मी या टप्प्यातील सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महान उत्सवात उत्साहाने सहभागी होण्याची विनंती करतो".

"मला विश्वास आहे की, आमचे तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने पुढे येऊन मतदान करतील. आपण मिळून आपली लोकशाही अधिक चैतन्यशील बनवूया", अशी पोस्ट मोदींनी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा सामना इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय यांच्यासोबत होत आहे.

उत्तर प्रदेशातील महत्वाच्या लढती

  • वाराणसी : नरेंद्र मोदी (भाजप) विरुद्ध अजय राय (काँग्रेस)

  • गोरखपूर : रवी किशन (भाजप) विरुद्ध काजल निषाद (सपा)

  • गाझीपूर : अफजल अन्सारी (सपा) विरुद्ध पारस नाथ राय (भाजप)

  • मिर्झापूर : अनुप्रिया पटेल (एडीएस)

  • चांदौली : महेंद्र नाथ पांडे (भाजप)

बिहारमध्ये महत्वाच्या लढती

  • पटना साहिब : रविशंकर प्रसाद (भाजप)

  • पाटलीपुत्र : मीसा भारती (आरजेडी) विरुद्ध राम कृपाल यादव (भाजप)

हिमाचल प्रदेशातील महत्वाच्या लढती

  • कांगडा : आनंद शर्मा (काँग्रेस)

  • मंडी : कंगना रणौत (भाजप) आणि विक्रमादित्य सिंग (काँग्रेस)

  • हमीरपूर : अनुराग ठाकूर (भाजप)

पंजाबमधील महत्वाच्या लढती

  • अमृतसर : तरनजीत सिंग संधू (भाजप)

  • जालंधर : चरणजित सिंग चन्नी (काँग्रेस) विरुद्ध सुशील कुमार रिंकू (भाजप)

  • लुधियाना : अमरिंदर सिंग राजा वारिंग (काँग्रेस) आणि रवनीत सिंग बिट्टू (भाजप)

  • भटिंडा : हरसिमरत कौर बादल (एसएडी) विरुद्ध गुरमीत सिंग खुदियान (आप)

  • पटियाला : प्रनीत कौर (भाजप) विरुद्ध धरमवीर गांधी (काँग्रेस) आणि बलबीर सिंग (आप)

पश्चिम बंगालमधील महत्वाच्या लढती

  • डायमंड हार्बर : अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)

  • कोलकाता उत्तर : तापस रॉय (भाजप) विरुद्ध सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल काँग्रेस)

  • बारासात : काकोली घोष दस्तीदार (तृणमूल काँग्रेस) विरुद्ध स्वपन मजुमदार (भाजप)

  • बशीरहाट: रेखा पात्रा (भाजप) विरुद्ध हाजी नुरुल इस्लाम (तृणमूल काँग्रेस)

झारखंडमधील महत्वाच्या लढती

  • दुमका: सीता सोरेन (भाजप) विरुद्ध नलिन सोरेन (जेएमएम)

  • गोड्डा : निशिकांत दुबे (भाजप)

चंदीगड एका जागेसाठी चुरशीची लढत

चंदीगड: मनीष तिवारी (काँग्रेस) विरुद्ध संजय टंडन (भाजप)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT