PM Narendra Modi Lok Sabha 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Narendra Modi : ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी सार्वजनिक जीवनासाठी अयोग्य होईल : नरेंद्र मोदी

Narendra Modi News: मी कधीही हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करणार नाही. ज्या दिवशी मी असं करेल, त्या दिवशी सार्वजनिक जीवनात राहण्यास पात्र नसेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

लोकसभा २०२४ निवडणुकीत पंतप्रधान मोदींकडून जाणीवपूर्वक हिंदू विरुद्ध मुस्लिम असा जातीय रंग दिला जातोय, असा आरोप विरोधकांनी केलाय. या आरोपाला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी एक मोठं विधान केलंय. ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनासाठी अयोग्य होईल, असं मोदींनी म्हटलंय.

माझ्या देशातील लोक प्रत्येक जातीचा व्यक्ती मला मतदान करेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. देशात लोकसभा निवडणुकीचे ४ टप्पे पूर्ण झाले असून आता पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

पहिल्या चार टप्प्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी देशाचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. यापार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीतून मोदींनी विरोधकांचे अनेक आरोप खोडून काढले.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

मी कधीही हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करणार नाही. ज्या दिवशी मी असं करेल, त्या दिवशी सार्वजनिक जीवनात राहण्यास पात्र नसेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मी जिथे लहानचे मोठे झालो, तिथे अनेक मुस्लिम राहतात. लहानपणीपासूनच माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत, असंही मोदी म्हणाले.

"माझ्या घरात आजूबाजूला सर्व मुस्लिम कुटुंबे आहेत. आमच्या घरातही ईद साजरी होते. ईदच्या दिवशी माझ्या घरी जेवण बनवले जात नव्हते. कारण मुस्लिम बांधवांकडून आम्हाला जेवण मिळायचे. मोहरम सणाच्या दिवशीही मी तजिया खालून जात होतो. त्यावेळी अनेक मित्र माझ्यासोबत असायचे. मात्र २००२ गोध्रा घटनेनंतर माझी प्रतिमा जाणूनबुजून मलीन करण्यात आली, असंही मोदींनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trendy Bags: ऑफिस, पार्टी किंवा फेस्टिव्हलसाठी 'या' बॅग्स प्रत्येक मुलींच्या कपाटात असल्या पाहिजेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये तरुणांची भररस्त्यात गुंडागर्दी

Marathi Actress : लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात; अंगठी दाखवत दिली नवीन नात्याची कबुली, पाहा PHOTOS

Jio Recharge: खुशखबर! Jioचा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन; 11 महिने SIM राहणार अ‍ॅक्टिव्ह

Nagpur : झोपेत आईच्या कुशीतून उचलले, छाती आणि दोन्ही हात खाल्ले; नागपुरात प्राण्याच्या हल्ल्यात ८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT