PM Modi In Nandurbar Saam Tv
लोकसभा २०२४

PM Modi In Nandurbar : मोदी जिवंत असेपर्यंत एससी, एसटी, ओबीसींचं आरक्षण कोणी घेऊ शकत नाही; नरेंद्र मोदींनी ठणकावलं

Nandurbar Lok Sabha 2024: नंदुरबारमध्ये हीना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा आज झाली आहे.

Rohini Gudaghe

सागर निकवाडे, नंदुरबार

वंचितांच्या अधिकाराचा मी चौकीदार आहे. मोदी जिवंत असेपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कोणी घेऊ शकत नाही, अशी गर्जना करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तोफ डागली. कर्नाटकमध्ये धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचंही ते म्हणाले. कर्नाटक मॉडेल पूर्ण देशात लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

नंदुरबारमध्ये हीना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात (PM Narendra Modi Sabha In Nandurbar) उतरले आहेत. आज नंदुरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हीना गावित (Heena Gavit) यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा आज झाली आहे. नंदुरबार लोकसभेत भाजप खासदार डॉ. हिना गावित आणि काँग्रेस गोवाल पाडवी यांच्यात थेट लढत होत आहे. चौथ्या टप्प्यात नंदुरबारमध्ये मतदान पार पडणार आहे.

देवमोगरा मातेच्या भूमिला, आदिवासी क्रांतिकारांना, जननायक यांना अभिवादन करत मोदींनी भाषणाला सुरुवात केली होती. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी थेट कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आदिवासी लोकांची कधी परवा नाही केली. काँग्रेसने सिकलसेल सारख्या आजारावर कामं केलं नाही. भाजपने यासाठी अभियान चालवल्याचं मोदी म्हणाले आहेत. हे कामं निवडणुकीसाठी नाही, तर आदिवासींच्या उज्ज्वल भविष्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विरोधक विकासाच्या कामाची स्पर्धा करू शकत नाहीत, म्हणून त्यांनी खोटं बोलण्याची मोहीम हाती घेतली (PM Modi) आहे. संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं कामं विरोधक करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दलित आणि आदिवासीचे आरक्षण काढून अल्पसंख्यांकांना देण्याचं कामं काँग्रेस करेल.

कर्नाटकात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी प्रयन्त केले जात असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. कर्नाटक मॉडेल पूर्ण देशात लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. वंचितांच्या अधिकाराचा मी चौकीदार (Nandurbar Lok Sabha) आहे. मोदी जिवंत असेपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कोणी घेऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी प्रयन्त केले जात असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. कर्नाटक मॉडेल पूर्ण देशात लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. वंचितांच्या अधिकाराचा मी चौकीदार आहे. मोदी जिवंत असेपर्यंत एससी, एसटी आणि काँग्रेसच्या शहजाद्यांचं गुरु अमेरिकेत राहतात. त्यांनी भारतीय लोकांवर वांशिक टिपणी केली आहे. मुर्म राष्ट्रपती होणे, काँग्रेस स्वीकारू शकत नाही. काँग्रेस पक्षाचा अजेंडा खतरनाक आहे. त्यांचा खुलासा राहुल गांधी यांच्या गुरूने केला असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमधे विलीन होण्याचं ठरवलं असल्याचं मोदी म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: शिक्षणासाठी घरापासून लांब राहिली, एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS नम्रता जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

Kumbh Rashi : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत शुभ आहे,मात्र करिअर...; वाचा कुंभ राशीभविष्य

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT