PM Modi Beed Public Meeting:
''गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझं घनिष्ट नातं राहिलं आहे. ते माझ्याशी नेहमी बीड आणि मराठवाड्याच्या विकासासंदर्भात चर्चा करायचे. आज त्यांची मनापासून आठवण येत आहे. 2014 मध्ये तुम्ही मला देशाची सेवा करण्याची संधी दिली. त्यावेळी मी देशभरातील गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या साथीदारांची निवड करून त्यांना दिल्लीत घेऊन गेलो. गोपीनाथ मुंडेंजवळ माझ्यापेक्षा जास्त अनुभव होता. मात्र काही दिवसांतच मला माझ्या सहकार्याला गमवावे लागले, हे माझं एक दुर्भाग्य आहे'', असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
आज बीड येथे पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पाडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप उमेदवार पंकजा मुंडे, बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे, भाजप नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
इंडिया आघाडीवर टीका करत मोदी म्हणाले की, ''इंडिया आघाडीचा एकच अजेंडा आहे, जर ते सरकारमध्ये आले तर ते मिशन कॅन्सल चालवतील. हे लोक सरकारमध्ये आल्यानंतर ते कलम 370 परत आणतील. आम्ही सीएए आणलं, ते रद्द करतील. तिहेरी तलाकच्या कायद्याला रद्द करतील. मी गरिबांना देत असलेले मोफत रेशन योजना ते बंद करतील.''
ते म्हणाले, ''काँग्रेस आता खुलेआम तुष्टीकरण आणि व्होट बँकेचा खेळ खेळत आहे. इंडिया आघाडी व्होट जिहादसाठी आवाहन करत आहे. 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना महाराष्ट्र काँग्रेस क्लीन चिट देत आहे. कसाब आणि पाकिस्तानातील इतर 10 दहशतवाद्यांशी काँग्रेसचे जवळचे संबंध आहेत.''
पंतप्रधान मोदी म्हणाले, ''बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना आरक्षणाचा अधिकार दिला होता. भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. यालाही बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला होता. पण काँग्रेस पक्षाला दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण हिसकावून ते धर्माच्या नावावर द्यायचे आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.