Narendra Modi on Congress  Saam TV
लोकसभा २०२४

Narendra Modi: काँग्रेसला संविधानाची पर्वा नव्हती, त्यांनी राज्यघटनेशी खेळ केला; PM मोदींचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024: काँग्रेसला देशाच्या संविधानाची पर्वा नव्हती. त्यांनी राज्यघटनेशी खेळ केला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Satish Daud

Narendra Modi on Congress

काँग्रेसला देशाच्या संविधानाची पर्वा नव्हती. त्यांनी राज्यघटनेशी खेळ केला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एससी-एसटीला दिलेले अधिकारही काँग्रेसने हिसकावून घेऊन मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न केला, असंही मोदींनी म्हटलं आहे. ते राजस्थान येथील जाहीर सभेत बोलत होते.

राजस्थानमधील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यास अवघा २४ तासांचा अवधी शिल्लक राहिलाय. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज टोंक-सवाई माधोपूर येथे जंगी सभा घेतली. या सभेतून त्यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी राजस्थानातील जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा होता. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हनुमान चालीसा ऐकणाऱ्या एका छोट्या दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली होती, असा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केला.

राजस्थानमध्ये काँग्रेसने रामनवमीवर बंदी घातली होती. शोभा यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांना काँग्रेसने सरकारी संरक्षण दिले होते. याच काँग्रेसने मालपुरा, टोंक, करौली, छाबरा यांना दंगलीच्या आगीत टाकले होते. अशा लोकांना माफ कराल का? असा सवालही मोदींनी उपस्थितांना विचारला.

जेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी आंध्र प्रदेशातील एससी-एसटी आरक्षण कमी करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. २००४ ते २०१० या काळात काँग्रेसने आंध्र प्रदेशात ४ वेळा मुस्लिम आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप देखील पंतप्रधान मोदींनी केला.

काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या सक्रियतेमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. काँग्रेसचा हा तुष्टीकरणाचा कट मी उघडकीस आणला आहे. यामुळेच काँग्रेसमधील नेते मला शिव्या देण्यात व्यस्त आहे, असंही मोदी म्हणाले.

काँग्रेसला संविधानाची पर्वा नव्हती, बाबासाहेब आंबेडकरांची पर्वा नव्हती. कर्नाटकात भाजपचे सरकार आल्यावर सर्वप्रथम धार्मिक आधारावर आरक्षण संपवण्याचे काम केलं. व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेसला विशिष्ट समाजाला आरक्षण द्यायचे होते, असा गंभीर आरोपही मोदींनी जाहीर सभेतून केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT