Rahul Gandhi On PM Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: 'ईव्हीएमशिवाय मोदी लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाहीत', राहुल गांधींची तोफ धडाडली

India Alliance Rally in Mumbai: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईव्हीएमशिवाय लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही', असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत.

Satish Kengar

Rahul Gandhi On PM Modi:

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईव्हीएमशिवाय लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाहीत', असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत. शिवाजी पार्कमधील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ''राजाचा आत्मा ईव्हीएम, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्समध्ये आहे, असे कुणीतरी सांगितले. याच राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली आणि माझ्या आईला रडत म्हटले की, मला लाज वाटते की, या सत्तेशी लढण्याची हिंमत माझ्यात नाही, मला तुरुंगात जायचे नाही. या प्रकाराने हजारो लोक घाबरले आहेत.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल गांधी म्हणाले, ''हा देश ९० अधिकारी चालवत आहेत. मी आतून व्यवस्था पाहिली आहे. म्हणूनच मोदीजी मला घाबरतात. माझ्यापासून काहीही लपून राहू शकत नाही. त्यातील तीन अधिकारी मागास वगार्तील आहेत. ३ दलित आहेत. हे ९० लोक पॉलिसी बनवतात. हीच खरी शक्ती भारत चालवत आहे.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''इथे कोणीतरी ईव्हीएमबद्दल बोलले. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत. आम्ही निवडणूक आयोगाला हे यंत्र विरोधी पक्षाला दाखवण्यास सांगितले. ते कसे चालते ते आम्हाला, असं सांगितलं.''

राहुल गांधी पुढे म्हणाले, ''तुम्ही लोक (सभेला जमलेले लोक ) जीएसटी भरता, तेवढीच रक्कम अदानी देतात. तुम्ही शर्टवर १८ टक्के जीएसटी भरता, अदानी सुद्धा तितकेच भरतो. मग हा पैसा जातो कुठे? तुमचे लक्ष दुसरीकडे वळवणे हे नरेंद्र मोदी यांचे काम आहे. कधी ते म्हणतील, चीनकडे बघा, पाकिस्तानकडे बघा. कधीतरी ते तुम्हाला मोबाईलची लाईट ऑन करायला सांगतील. कधी म्हणतील माझा अपमान करण्यात आला. मात्र आज भारतात सर्वाधिक बेरोजगारी आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT