Amit Shah On Lok Sabha Election:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार टप्प्यांत 270 जागांचा टप्पा ओलांडला आहे, हे डायरीत लिहून ठेवा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. आज बिहारमध्ये एका सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि आरजेडीवर हल्लाबोल केला आहे.
ते म्हणाले आहेत की, ''लालूजींच्या पक्षाला (आरजेडी) चार जागाही मिळणार नाहीत आणि राहुल गांधी चाळीस जागाही मिळणार नाहीत. शहा म्हणाले की, इंडिया आघाडीचा सुपडा साफ होणार आहे. यादरम्यान शहा यांनी बिहारमधील पूर्व चंपारण लोकसभा मतदारसंघातून एनडीए समर्थित भाजप उमेदवार संजय जयस्वाल यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
इंडिया आघाडीवर आरोप करताना शहा म्हणाले की, हे लोक खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. ते म्हणतात की, मोदीजींनी 400 पार केली तर ते आरक्षण संपवतील. यापेक्षा मोठे खोटे असूच शकत नाही. मोदींकडे दहा वर्षे पुरेसे बहुमत आहे, त्यांनी आरक्षणाला हात घातला का? जोपर्यंत संसदेत भाजपचा एकही खासदार आहे, तोपर्यंत एससी-एसटी-ओबीसींच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, असेही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकण्याचे काम काँग्रेसने केल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मुस्लिमांना आरक्षण दिले असून ते संविधानानुसार नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, मला लालूजींना विचारायचे आहे की, तुम्ही ज्या काँग्रेसच्या कुशीत बसलात त्यांनी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले. ओबीसींच्या कोट्यातील आरक्षण त्यांना देण्यात आलं. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी लालू यादव एसी, एसटी आणि ओबीसीविरोधी काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत, असा आरोप शहा यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.