Parbhani Lok sabha 2024 Saam TV
लोकसभा २०२४

Parbhani Lok Sabha: संजय जाधव पुन्हा निवडून आले तर ईडीच्या भीतीने भाजपमध्ये जातील; वंचितच्या उमेदवाराचं भाकित

Lok Sabha Election 2024: खासदार संजय जाधव पुन्हा निवडून आले, तर ED च्या भीतीने भाजपमध्ये जातील, असं भाकित वंचित बहुजन आघाडीचे परभणीचे उमेदवार पंजाबराव डख यांनी केलं आहे.

Satish Daud

Parbhani Lok Sabha Constituency

खासदार संजय जाधव पुन्हा निवडून आले, तर ED च्या भीतीने भाजपमध्ये जातील, असं भाकित वंचित बहुजन आघाडीचे परभणीचे उमेदवार पंजाबराव डख यांनी केलं आहे. महादेव जानकर जिल्ह्याबाहेरील उमेदवार असून ते निवडून आल्यास संविधान बदलील, अशी टीकाही पंजाबराव डख यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मुलाला पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींना परभणीत सभा घ्यावी लागते, असा टोलाही डख यांनी लगावला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) या मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

त्यांच्या विरोधात भाजपने महादेव जानकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डख यांनी निवडणूक अर्ज भरला आहे. त्यामुळे परभणीत नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जंगी सभा घेतल्या आहेत. महादेव जानकरांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी परभणीत येऊन गेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी देखील या मतदारसंघात जंगी सभा घेतली आहे.

दुसरीकडे पंजाबराव डख यांनी देखील वंचितकडून जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारादरम्यान ते महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधत आहेत. संजय जाधव परभणीतून पुन्हा निवडून आल्यास ईडीच्या धाकाने भाजपमध्ये जातील, असं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर महादेव जानकर हे जिल्ह्याबाहेरील उमेदवार असून ते निवडून येण्यापूर्वीच संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे मतदारांनी जागरुक होऊन वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं, असं आवाहन पंजाबराव डख परभणीकरांना करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India National Food: भारताचे राष्ट्रीय अन्न कोणते आहे? ९९% लोकांना माहित नसेल

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : बीडच्या 2 आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Today Gold Rate: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले; वाचा १ तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: अमरावती- मुंबई विमान सेवा बंद, प्रवाशांचे नियोजन कोलमडले

SCROLL FOR NEXT