Nilesh Lanke Resign News
Nilesh Lanke Resign News Saam Tv
लोकसभा २०२४

Nilesh Lanke Resign: मोठी बातमी! निलेश लंके यांनी आमदारकीचा दिला राजीनामा

साम टिव्ही ब्युरो

>> सुशील थोरात

Nilesh Lanke Resign News:

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आता आमदार निलेश लंके हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार गटात पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती. यातच त्यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना निलेश लंके हे भावुक झाले होते.

'जे बोलतो, ते करतो'

आपल्याला पुढे लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे. कोणीही पुढे कायद्याच्या चौकटीत आपल्याला अडकवायला नको, असं म्हणत त्यांनी निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते म्हणाले, 'जे बोलतो, ते करतो'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजीनामा दिल्याचं जाहीर करण्याआधी निलेश लंके यांनी आज आपल्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर यांनी या लोकसभेला आपण महाविकास आघाडी कडून मैदानात उतरत असल्यास जाहीर केले. त्यामुळे आता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके अशी सरळ लढत होणार आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, निलेश लंके यांनी आज आपली भूमिका जाहीर केल्यामुळे आता अहमदनगर दक्षिण मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. या चुरशीच्या लढाईत बाजी कोण मारेल याबाबत निवडणूक निकालानंतर कळेलच.

कोण आहेत निलेश लंके?

निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. लंके यांचं 12 वी पर्यंत शिक्षण झालं असून नंतर त्यांनी आयटीआय केलं. निलेश लंके यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. ते वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख झाले. त्यांनी पक्षात काम करत असताना हंगा गावची ग्रामपंचायत जिंकली होती. पुढे 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या एका वादातून त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. शिवसेनेतून काढल्यानंतर लंके यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Accident : भरधाव दुचाकी बसला धडकली; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Breakfast Recipe : सोप्या पद्धतीनं बनवा सर्वांचा आवडता रवा ढोकळा

Shiv Sena vs BJP : नरेंद्र मोदी ४ जूननंतर पंतप्रधान नसतील, ते झोला घेऊन हिमालयात जातील; शिवसेना ठाकरे गटाची टीका

Chardham Yatra 2024: भाविकांसाठी मोठी बातमी! अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर चारधाम यात्रेला सुरुवात; केदारनाथ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले

10th Exam Fess: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ, आता किती फी भरावी लागणार?

SCROLL FOR NEXT