ncp leader sharad pawar held meeting for satara lok sabha constituency in pune saam tv
लोकसभा २०२४

सातारा लाेकसभा मतदारसंघात उदयनराजे भाेसले मैदानात? काेण देईल टक्कर, बाळासाहेब पाटील की शशिकांत शिंदे; शरद पवारांची पुण्यात बैठक सुरु

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Satara Lok Sabha Constituency :

सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी बाबत चर्चा करण्याासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची आज (बुधवार) पुण्यातील शिवाजीनगर येथील मोदीबाग या निवासस्थानी राष्ट्रवादीमधील नेत्यांसमवेत बैठक सुरु झाली आहे. पुतणे अजित पवार (ajit pawar) यांनी पक्षाची साथ साेडल्याने सातारा लाेकसभा मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून देखील उमेदवार असू शकताे. यामुळे पवार नेमकी काेणती रणनिती ठरवली हे बैठकीनंतर समजेल. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा लोकसभा मतदारसंघा बाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता. 19 मार्च) विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (shrinivas patil), त्यांचे चिरंजीव सांरग पाटील (sarang patil) यांनी शरद पवार यांची भेट घेतली हाेती. या भेटीनंतर माध्यमांना चर्चेबाबत माहिती देण्यात फारसे स्वारस्य दाखविले नाही. दरम्यान पाटील पिता-पुत्रास कार्यकर्त्यांनी विराेध दर्शविल्याची खात्रीशिर माहिती उपलब्ध झाली आहे.

आज विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (mlc shashikant shinde), राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (jayant patil), आमदार बाळासाहेब पाटील (balasaheb patil) हे शरद पवार यांच्या समवेत सातारा लाेकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी बाबतची चर्चा सुरु आहे.

पुतणे अजित पवार यांनी पक्षाची साथ साेडल्याने शरद पवार गट उमेदवार निवडताना सावध पाऊल उचलणार असे चित्र आहे. सातारा लाेकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, त्यांचे चिरंजीव सारंग पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे हे उमेदवार म्हणून असू शकतात.

दरम्यान उद्या (गुरुवार) महाविकास आघाडीची बैठक हाेणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपले उमेदवार आज दिवसभरात निश्चित करेल असा अंदाज आहे.

बाळासाहेब पाटील की शशिकांत शिंदे?

दरम्यान भाजपचे राज्यभा खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) हे निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांची उमेदवारी अद्याप निश्चित झाली नसली तरी त्यांची उमेदवारी गृहित धरुन बाळासाहेब पाटील किंवा शशिकांत शिंदे यापैकी एकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यास काय हाेईल याचा अंदाज शरद पवार गट घेत आहे.

लक्ष्मण माने लातूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक

माजी आमदार लक्ष्मण माने (laxman mane) यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर साम टीव्हीशी बाेलताना माने म्हणाले मी लातूर लोकसभा मतदारसंघा बाबत पवार यांच्याशी चर्चा केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही जागा काँग्रेसकडे गेली आहे. ही जागा आम्हाला सोडावी अशी मागणी मी केली आहे. दरम्यान जागा राष्ट्रवादीची असती तर काही अडचण नसती. काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाहीत. त्यामुळे तुमच्या माध्यमातून दिल्लीत निरोप गेला तर बरं होईल असेही मी शरद पवार यांना सांगितल्याचे माने यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT