nationalist congress party sharadchandra pawar karyakarta wish to contest lok sabha election in wardha saam tv
लोकसभा २०२४

Wardha Lok Sabha 2024 : अमर काळेंना शरद पवार गटातूनच विराेध; कार्यकर्त्यांचा तिघांच्या नावावर शिक्कामोर्तब

nationalist congress party sharadchandra pawar : हर्षवर्धन देशमुख, राजू तिमांडे किंवा समीर देशमुख यांना वर्धामधून उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्ते इच्छा व्यक्त करु लागले आहेत.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha Lok Sabha Constituency :

दुसऱ्या पक्षाच्या माणसाला उमेदवारी देणे म्हणजे लाचारी ठरेल अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे (amar kale) हे तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे निश्चित झाल्याने पवार गट नाराज झाला आहे. या गटातील कार्यकर्त्यांची वर्धा लाेकसभा मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी हाेऊ लागली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतात वर्धेची जागा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसला मागितली जात होती मात्र ती काँग्रेसला जातं होती. यंदा योगायोगाने विदर्भात केवळ एक जागा राष्ट्रवादीला मिळाली. त्यात वर्धेची जागा वाट्याला आली आहे. एक जागा विदर्भात राष्ट्रवादी लढत आहे. यात प्रामुख्याने उमेदवार हा मूळचा राष्ट्रवादीचाच असायला हवा असा आग्रह कार्यकर्ते करु लागले आहेत.

राष्ट्रवादीचे तीन लोक उमेदवारी मागत आहे. जर पक्ष संघटना कमकुवत आहे कोणी उमेदवारी मागत नसेल तर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर गोष्ट वेगळी आहे. पण पक्षाकडे उमेदवार आहे ते उमेदवारी मागत आहेत. मग बाहेरून उमेदवार आणण्याची गरज काय असा सवाल कार्यकर्ते करु लागले आहेत.

दुसऱ्या पक्षातला उमेदवार आपल्या पक्षात घेणे आणि त्याला उमेदवारी देणे ही एकप्रकारची लाचारी झाली असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. वर्धा येथून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना पवार गटाकडून उमेदवारी दिल्या जाणार असल्याच जवळपास निश्चित झाल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून काळेंना विरोध हाेऊ लागला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8AM Diabetes Symptoms: सकाळी उठल्यावर ब्लड शुगर का वाढलेली असते? 5 गोष्टी ठरतात कारणीभूत

Maharashtra Live News Update: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

Shocking: नात्याला काळिमा! भावाने केला बहिणीवर बलात्कार अन् टेरेसवरून दिले फेकून, ८ वर्षांपासून करत होता अत्याचार

Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळ फटका, विदर्भाला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

BSNL Recruitment: बीएसएनएलमध्ये नोकरीची संधी; १२० पदांसाठी भरती; पगार ५० हजारांपर्यंत; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT