Mumbai Police Saam Tv
लोकसभा २०२४

Nashik Loksabha: मतदानाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट; तब्बल ३ हजार ५१८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Maharashtra Loksabha Election 2024: उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला जात आहे. मतदान काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. १९ मे २०२४

मुंबई, नाशिक, ठाणे, कल्याणसह लोकसभेच्या १३ मतदार संघांसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या असून शहरातील तीन हजारपेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा उद्या पार पडणार आहे. नाशिकमध्ये लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला जात आहे. मतदान काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

त्यामुळे शहरातील उपद्रवींनी मतदानाला जावं आणि थेट घरात बसावं, असे आदेशच पोलिसांनी काढले आहेत. तसेच ३ हजार ५१८ सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए, मोक्का, तडीपार, फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.

यांपैकी ३१३ जणांना मतदान केंद्र तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधात्मक कारवाईत सराईत गुन्हेगारांसह काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. नाशिक शहरातील मतदान निर्भय वातावरणात पार पडावं, मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar Name: छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते

Maharashtra Live News Update : पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना नकोच - आसिफ शेख

Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक कल्याणमध्ये येऊन लढा; खासदार श्रीकांत शिंदे यांचं गणेश नाईक यांना खुलं आव्हान

Weight Loss: जिमला न जाता वजन कसे कमी करावे?

IND vs PAK, Women’s Asia Cup Rising Stars: पाकिस्तानचा धुव्वा; T20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट राखत विजय

SCROLL FOR NEXT