Hemant Godse Saam TV
लोकसभा २०२४

Hemant Godse: नाशिकचा गुंता सुटला! शिवसेनेचे हेमंत गोडसे आखाड्यात; पहिल्याच प्रतिक्रियेत रणनीती सांगितली

Nashik Lok Sabha Constituency: महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. तब्बल एका महिन्यानंतर नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. महायुतीकडून यासंदर्भात परिपत्रक काढत हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

Priya More

इच्छुकांची मांदियाळी, उमेदवारीवर दावा-प्रतिदावा, चर्चेच्या फेऱ्या, नेत्यांमधील नाराजीनाट्य आणि त्यानंतर घटकपक्षांच्या वरिष्ठांशी चर्चा करून या नाट्यावर टाकलेला पडदा असे बरेच अडथळे पार करत अगदी अखेरच्या क्षणी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीच्या घटकपक्षांमध्ये निर्माण झालेला गुंता सुटला आहे. नाशिकमधून महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना रणांगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळं नाशिकमधील प्रमुख लढतीचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालं आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. अशामध्ये अखेर एका महिन्यानंतर या जागेवरून नाशिक लोकसभा मतदारसंघातील (Nashik Lok Sabha Constituency) जागा वाटपावरून महायुतीमध्ये असलेला तिढा अखेर सुटला. महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. तब्बल एका महिन्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले.

शिवसेना पक्षाकडून सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करत हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या पोस्टमध्ये पक्षाकडून असे लिहिण्यात आले आहे की, 'लोकसभा निवडणूक - २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.' या पोस्टद्वारे पक्षाकडून हेमंत गोडसे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.

हेमंत गोडसे हे गेल्या १० वर्षापासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आता त्यांना तिसऱ्यांदा पक्षाकडून संधी मिळाली आहे. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. हेमंत गोडसे यांनी मंगळवारी रात्रीच गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. आता उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये होणार आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, 'शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. मी ज्याप्रकारे गेल्या १० वर्षांपासून नाशिक लोकसभेचे नेतृत्व केले. त्यावरून शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास आणि जबाबदारी टाकली. ती पूर्णपणे आम्ही पार पाडू.' तसंच, 'गेल्या १० वर्षांपासून याठिकाणी नेतृत्व करत आहे त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात आपण पोहचलो आहोत. गेल्या महिन्याभरापासून प्रचार यंत्रणा सुरू आहे. ही जागा खऱ्या अर्थाने शिवसेनेची आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: मकर राशीत बनतोय त्रिग्रही राजयोग; 'या' राशींची धनलाभासह होणार भरपूर प्रगती

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास; दोनदा UPSC क्रॅक; IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले; मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

SCROLL FOR NEXT