Raj Thackeray Saam TV
लोकसभा २०२४

Raj Thackeray: पंतप्रधान मोदींना पाठिंबा कशासाठी? राज ठाकरेंनी सांगितल्या मनसेच्या मागण्या

Raj Thackeray Press Conference: बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. १३ एप्रिल २०२४

पाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुंकाच्या दृष्टीने मनसेची ही महत्वपूर्ण बैठक असून राज ठाकरे महायुतीच्या प्रचारामध्ये उतरण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

"गुढीपाडवा मेळाव्यात माझी भूमिका मांडली. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्याच विश्लेषण देखील केलं आहे. पहिल्या पाच वर्षात जे पटल नाही त्याचा विरोध देखील केला. लोक म्हणतात राज ठाकरे यांनी भूमिका बदलली. मी भूमिका बदलली नाही, माझ्या धोरणांवर कायम आहे, पुढच्या पाच वर्षात जे चांगलं झालं त्याच समर्थन देखील केले... असे राज ठाकरे म्हणाले.

..राममंदिर झालं नसतं!

"३७o हटले, राम मंदिर झाले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभाच राहू शकाल नसतं १९७० पासून रखडलेली गोष्ट झाली. ज्या कार सेवकांचा बळी गेला, त्या सगळ्या कार सेवकांचे आत्मे राम मंदिर उभे राहिल्यानंतर शांत झाले असतील, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.

काय आहेत मनसेच्या मागण्या?

"एका बाजूला खंबीर नेतृत्व असतानाआमच्या पक्षाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र आमच्या काही मागण्या आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, गड किल्ल्याचं संरक्षण व्हावे. गुजरात त्यांच राज्य असल्याने त्याबद्दल प्रेम असणं साहजिक आहे. पण नरेंद्र मोदी यांनी सगळी राज्य समान अपत्यांसारखी बघावीत, "असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT