msc bank released godown of shri vitthal sahakari sakhar karkhana abhijeet patil to support bjp in madha Saam Digital
लोकसभा २०२४

Abhijeet Patil: माढ्यात माेठ्या राजकीय घडमाेडी, विठ्ठल कारखान्यावरील जप्ती मागे; अभिजीत पाटील करणार भाजपला मदत, Video

Madha Lok Sabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीला साेडचिठ्ठी दिली. अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला.

भारत नागणे

Vitthal Sahakari Sakhar Karkhana :

राज्य सहकारी बँकेने डी.आर.डी न्यायालयात त्यांचे म्हणणे मांडल्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील (Shri Vitthal Sahakari Sakhar Karkhana) जप्तीची कारवाई टळली आहे. यामुळे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

जुन्या संचालक मंडळांन घेतलेल्या कर्ज वसूल करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने (Maharashtra State Co-operative Bank) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला हाेता. यामध्ये बँकेने साखरेचे गोडवूनसह इतर मालमत्ता ताब्यात घेतली हाेती.

या जप्तीच्या कारवाई नंतर पंढरपुरात राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीला साेडचिठ्ठी दिली. अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साम टीव्हीशी बाेलताना अभिजीत पाटील म्हणाले 342 कोटी रुपये थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बॅंकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली हाेती. डी.आर.डी न्यायालयात बॅंकेने म्हणणे सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर जप्तीची कारवाई रद्द झाली आहे.

दरम्यान उद्या आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल साखर कारखान्यावर भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार आहाेत असेही पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: मकर राशीत बनतोय त्रिग्रही राजयोग; 'या' राशींची धनलाभासह होणार भरपूर प्रगती

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास; दोनदा UPSC क्रॅक; IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले; मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

SCROLL FOR NEXT