mp shrinivas patil will not contest satara lok sabha consituency says ncp karykartas saam tv
लोकसभा २०२४

Sharad Pawar News : सातारा लाेकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांची माघार, शरद पवार निवडणुकीच्या मैदानात? (Video)

Satara Lok Sabha Election 2024 : बहुतांश कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह आजही धरला आहे. आज शरद पवार बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

ओंकार कदम

Satara Lok Sabha Consituency :

साता-याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (mp shrinivas patil latest marathi news) हे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार नसल्याची चर्चा आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. प्रकृतीच्या कारणामुळे खासदार श्रीनिवास पाटील हे निवडणुक लढविणार नाहीत असे त्यांनी खूद्द ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील सांगितल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार निवडण्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे आज (शुक्रवार) सातारा (sharad pawar in satara) दाै-यावर आले आहेत. ते सुमारे 200 कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करीत आहेत.

दरम्यान साम टीव्हीशी संवाद साधताना विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे नेत्यांनी इतर नावांचा विचार करावा असं स्वतः पाटील यांनी पवार यांना सांगितल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले. बहुतांश कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी स्वतः निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT