Rais Shaikh News:
एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राज्यातील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याने अखिलेश यादव यांच्यासाह महाविकास आघाडीलाही मोट धक्का बसला आहे.
रईस शेख हे सपाचे भिंवडीचे आमदार आहेत. पक्षातल्या अंतर्गत कलहामुळं दिला राजीनामा असल्याचं राईस शेख यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना सांगितलं आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रईस शेख हे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र त्यांनी अद्याप पुढे ते कोणती भूमिका घेतील हे जाहीर केलेलं नाही.
रईस शेख हे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते नगरपरिषद आणि समाजवादी पक्षाचे गटनेतेही राहिले आहेत . त्यांनी २०१२ मध्ये गोवंडी आणि २०१७ मध्ये नागपाडा येथून बीएमसी निवडणूक लढवली आणि जिंकलीही. मुंबई मिररच्या सर्वेक्षणानुसार, शेख हे मुंबईतील टॉप १० नगरसेवकांमध्येही होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व मतदारसंघातून रईस शेख ४५,१३३ मतांनी विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे रुपेश लक्ष्मण म्हात्रे आणि काँग्रेसचे संतोष शेट्टी यांचा पराभव केला होता.
दरम्यान, रईस शेख यांनी आपला राजीनामा हा माजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी सुपूर्द केला आहे. शेख यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. ते पुढे काय निर्णय घेणार आहेत, याची कार्यकर्ता प्रतीक्षा करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.