Manoj Jarange Patil Saam TV
लोकसभा २०२४

Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही, मनोज जरांगे यांची घोषणा

Loksabha Election 2024 : परस्पर उमेदवार निश्चित करून मला अहवाल दिला, हे बरोबर नाही. अहवाल तयार करताना काही जणांनी मनमानी केली. सह्या देखील स्वतःच्या ठोकल्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

Manoj Jarange News :

लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे. अलीकडच्या 6 दिवसात आरक्षण विषयापेक्षा राजकारणच जास्त झालं आहे. राजकारण करू नका, या मताचा मी नाही. पण आरक्षण विषय बाजूला जाऊ देऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं.

अनेक तालुक्यात मराठा बांधवांनी परस्पर बैठका घेतल्या. या बैठकांची खेड्या-पाड्यातील बांधवांना कुणालाही कल्पना नाही. परस्पर उमेदवार निश्चित करून मला अहवाल दिला, हे बरोबर नाही. अहवाल तयार करताना काही जणांनी मनमानी केली. सह्या देखील स्वतःच्या ठोकल्या.

आपल्या रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण ठेवा. महाराष्ट्रात अनेक गावांत मराठा बांधव पोहचले नाही. राजकारण हे समाजापेक्षा मोठं नाही. राजकारणापायी मी समाजाच वाटोळं होऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

राजकारणाने आपलं वाटोळं होईल, तुमच्या रक्तात आरक्षण भिनू द्या. जर सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत धिंगाणाच आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यास मी खंबीर आहे.

माझ्याकडे आलेल्या अहवालावरून मला उमेदवार देता येणार नाही. अपक्ष उमेदवार मी देणार नाही. ज्याला पाडायचं त्याला पाडा. ज्याला निवडून द्यायचं त्याला द्या. जो सगे-सोयरे कायद्याला पाठिंबा देईल, त्याला मतदान करा बाकीच्यांना पाडा. विधानसभा निवडणुकीची तयारी करा, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

SCROLL FOR NEXT