mahayuti will lose kolhapur and satara lok sabha constituency says ncp leader jayant patil  saam tv
लोकसभा २०२४

Jayant Patil On BJP Mission 45 Plus : महायुतीचे उमेदवार ठरण्यापूर्वीच काेल्हापूर, सातारा लाेकसभा मतदरासंघात जयंत पाटलांचा विजयाचा दावा

Lok Sabha Election 2024 : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला नाही तर आम्हांला उमेदवार द्यावा लागेल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Maharashtra Election 2024 :

महायुतीने काेल्हापूर आणि सातारा लाेकसभा मतदरासंघात उमेदवारांच्या नावाची घाेषणा करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दाेन्ही जागा महाविकास आघाडी मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच्या 45 प्लस या घाेेषणेवर बाेलताना जयंत पाटील यांनी भाकित केले.  (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

जयंत पाटील म्हणाले महाविकास आघाडी हातकणंगले मध्ये उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. राजू शेट्टी यांनी मविआचा पाठिंबा घेतला नाही तर आम्हांला उमेदवार द्यावा लागेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले. माढ्याची जागा महादेव जानकर यांना देण्याचे ठरले होते परंतु ते महायुती सोबत गेले. त्यामुळे तिथे दुसरा उमेदवार शोधावा लागेल.

भाजपच्या 45 प्लस नाऱ्याची जयंत पाटलांकडून खिल्ली उडविण्यात आली. ते म्हणाले कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रत्येक पक्ष अशा गाेष्टी करीत असताे. तुम्ही जर कोल्हापूरात फिरला तर त्यांची एक जागा कमी झालेली तुम्हांला दिसेल तसेच थाेडसं पुढं गेल्यावर साताऱ्यात दुसरी होईल असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले हे आमच्याशी संपर्कात नाही असेही पाटील यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT