Balasaheb Thorat, Nana patole, Narendra Modi, Rahul Gandi, Saam Tv Digital News SAAM TV
लोकसभा २०२४

Loksabha Election: देशात कुणाचं सरकार? कोण होणार पंतप्रधान?; काँग्रेसच्या नेत्यानं महाराष्ट्राचा अंदाजही सांगितला

Maharashtra Loksabha Election: लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राजकीय वर्तुळात निकालाची उत्सुकता आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभेच्या निकालावरुन सर्वात महत्वाचे विधान केले असून नव्या पंतप्रधानाचे नावही सांगून टाकले आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. १ जून २०२४

देशामध्ये इंडिया आघाडीचे सरकार येणार असून महाराष्ट्रात इंडिया आघाडी ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये पंतप्रधान कोण असेल? यावरुनही त्यांनी महत्वाचे विधान केले. नागपुरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"एक्झिट पोलमध्ये काहीही येऊ दे. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार. जुमलेबाज सरकार हद्दपार होणार आहे. बदलांच वारे वाहिल्याने आघाडीला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच एक्झिट पोलला जायचे नाही म्हणजे पराभव स्विकारला असे नाही, आमचे निकालावर लक्ष असेल," असेही ते यावेळी म्हणाले.

"इंडिया आघाडीची मोट बांधून आम्ही लढलो. इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आणि तो पंतप्रधान कोण व्हावा तर माझा नेता व्हावा राहुल गांधी व्हावे असे मला वाटतं.इंडिया आघाडीत जी काही चर्चा होईल. त्या चर्चेमध्ये जे नाव पुढे येईल तो इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

"महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होईल. यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सुद्धा आहे. कितीही पैसे लावले असले तरी भाजप निवडून येणार नाही. भाजपच्या विरोधात लोकांनी मतदान केले असून महाराष्ट्रात भाजपपेक्षा पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडी जिंकेल, असे म्हणत इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होईल ही काळा दगडावरची पांढरी रेख आहे भाजप सत्तेतून बाहेर गेलेला दिसेल, असा टोलाही विजय वडेट्टीवार यानी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Union Budget 2026: यंदा देशाचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? वाचा तारीख आणि वेळ

Buldhana : पालकमंत्री मराठा असल्याची लाज वाटते ,महेश डोंगरेंचा संताप; जिजाऊ जन्मोत्सवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..

Navi Mumbai: नवी मुंबईत शिंदेंच्या शिंवसेनेला खिंडार, बड्या नेत्यासह २० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Oscar: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका; 'कांतारा चॅप्टर १' आणि 'तन्वी द ग्रेट' ऑस्करच्या स्पर्धेत

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जाहीरनाम्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकाशन

SCROLL FOR NEXT