Madha loksabha Constituency News:
Madha loksabha Constituency News:  Saamtv
लोकसभा २०२४

Madha Loksabha: माढ्यात नवा ट्वीस्ट! 'शेकाप'मध्ये फूट पडण्याची शक्यता; अनिकेत देशमुख अपक्ष अर्ज भरणार?

भारत नागणे

पंढरपुर|ता. १८ एप्रिल २०२४

माढा लोकसभा मतदार संघात राजकीय घडामोडी सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. माढ्यातून महाविकास आघाडीकडून धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता महाविकास आघाडीसोबत असलेल्या शेतकरी कामगार पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता असून युवा नेते डॉ अनिकेत देशमुख अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनिकेत देशमुख अपक्ष लोकसभेच्या रिंगणात..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ अनिकेत देशमुख हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. महाविकास आघाडीकडे त्यांनी उमेदवारीची मागणीही केली होती. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेल्या या जागेवरुन नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी दिलेले धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) उमेदवारी नाकारल्यानंतर शेतकरी कामगार पक्षात फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून डॉ अनिकेत देशमुख उद्या माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज सांगोल्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मविआच्या अडचणी वाढणार?

दरम्यान, अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) हे दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. त्यांनी २०१९ची विधानसभा निवडणुकही लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघ्या 700 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. अशातच आता त्यांनी माढ्यातून अपक्ष लढण्याची तयारी केल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८ वर; SIT तपास सुरू

Dog Attack on Child : भटक्या कुत्र्यांचा ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला; घराबाहेर पडताच लचके तोडले; नागपुरातील भयानक घटना

Assam News: एका कोंबड्यानं घेतला ३ जणांचा जीव; विहिरीत सापडले तिघांचे मृतदेह

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जरा जपून ठेवा, 'या' भागातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

Terrorist Attack : भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट; गुजरातमध्ये लपवली शस्त्रे, ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT