Sharad PAwar - Chagan Bhujbal Saam TV
लोकसभा २०२४

Sharad Pawar News: '...म्हणून २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी सोडली'; छगन भुजबळांचे नाव घेत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

Maharashtra Politics News: राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षस्थापनेपासून अद्याप मुख्यमंत्रीपद मिळवण्यात आले नाही. २००४ मध्ये सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतरही काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद गेले

Gangappa Pujari

राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षस्थापनेपासून अद्याप मुख्यमंत्रीपद मिळवण्यात आले नाही. २००४ मध्ये सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतरही काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद गेले. यावरुनच अजित पवार गटाने जाहीरपणे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वात मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

२००४ मध्ये संधी असतानाही मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय अत्यंत विचारपुर्वक घेण्यात आला होता.आमच्या पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आणि योग्य उमेदवार नव्हता. अजित पवार त्यावेळी राजकारणात नवखे होते. त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फुट पडली असती. त्यामुळेच काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन सर्वाधिक मंत्रीपदे घेण्याचा निर्णय झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच प्रफुल्ल पटेल हे २००४ पासूनच भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी उत्सुक होते. असा सर्वात मोठा गौप्यस्फोटही शरद पवार यांनी यावेळी केला. २००४मध्ये ते भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र तुम्हाला जायचे असल्यास जा, असा सल्ला मी त्यांना दिला. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रु आले, असे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले असले तरी जनता खऱ्या पक्षांसोबत आहे. नेते गेले असले तरी कार्यकर्ते आणि जनता महाविकास आघाडीसोबत आहे, त्याचा परिणाम या निवडणूकीत पाहायला मिळेल, असेही शरद पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: नाशिक गुजरात महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT