Sanjay Raut Press Conference Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: भाजपला निवडणुकीदरम्यान हिंसाचाराची गरज पडते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut Press Conference: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्या अकरा वाजता शिवालय येथे संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार असल्याची माहिती दिली आहे. या परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आदी नेते उपस्थिती असतील, असं ते म्हटले आहेत.

Rohini Gudaghe

मयूर राणे साम टीव्ही, मुंबई

Sanjay Raut Criticized BJP

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जे तिढे होते ते मिटले आहेत. त्यामुळे उद्याच्या शुभ दिनी आमची अकरा वाजता शिवालय येथे संयुक्त पत्रकार परिषद पार पडत (Sanjay Raut Press Conference) आहे. या परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे नेते उपस्थित असणार आहे. (Maharashtra Lok sabha Election)

आमच्यात काही बिघाडी नाही. उलट त्यांच्यात काहीच ठरलं नाही, असा पलटवार त्यांनी विरोधकांवर केला आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्ही उद्या कशा प्रकारे पुढे काम करणार याविषयी माहिती (Sanjay Raut Criticized BJP) देऊ. नाना पटोले यांच्यावर बोलताना राऊत म्हणाले की, कार्यकर्त्याममुळे नेत्यांना थोडं झुकावं लागतं. त्यामुळे काही ठिकाणी वाद पाहायला मिळाले आहेत. पण कोणीही टोकाची भूमिका घेत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी (CM Yogi) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले की, दहा वर्षानंतरही यांना मतं मागण्यासाठी यावं लागतं. उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती चांगली नाही. तरीही हे इथे येत आहेत, हे कोड ऑफ कंडक्टच उल्लंघन आहे. ते बोलताना म्हणाले की, निवडणूकी दरम्यान हिंसाचाराची गरज भाजपला पडते. त्यांनी परखड शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

वडेट्टीवार चांगलं बोलतात. उद्या आम्ही सर्व सविस्तर उद्या बोलू. आमच्यात काही मतभेद नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली (Maharashtra Politics) आहे. राऊत म्हणाले की, हे खरं आहे. निवडणुका सुरु आहेत. त्यात यंत्रणा अश्या प्रकारे त्रास देत आहेत.

अमोल कीर्तिकर यांच्यावर बोलताना राऊत (Sanjay Raut News) म्हणाले की, काय गुन्हा झाला. ज्यांची चौकशी सुरु आहे ते उमेदवार होऊ शकतात. मोदींनी (PM Modi) टीका केलेल्या लोकांना सत्तेत घेतलं त्याच काय? असा सवालही त्यांनी केला आहे. ते म्हणाले की फारूक, मेहबुबा मोठे नेते आहेत. त्यांची त्यांची आपली आपली भूमिका तिकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT