MLA Sanjay Kute News:  Saamtv
लोकसभा २०२४

Buldhana News: ...म्हणून बुलढाण्याच्या जागेवर दावा केला नाही; भाजप आमदार संजय कुटेंचा मोठा गौप्यस्फोट

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २९ मार्च २०२४

Buldhana Constituency News:

बुलढाणा लोकसभेची जागा ही शिवसेनेलाच सुटणार आणि उमेदवार खासदार प्रतापराव जाधव असणार हे मला १ महिन्याआधीच माहीत होते, त्यामुळेच ही जागा भाजपने मागितली नसल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी केला. बुलढाण्यात काल शुक्रवारी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. (Maharashtra Loksabha Eletion)

काय म्हणाले संजय कुटे?

"उमेदवार कोण हे मला एक महिन्या पूर्वी माहीत होते. डॉ. शिंगणे आणि मी वरिष्ठांच्या संपर्कात होतो. तेव्हाच त्यांनी सांगितले. त्यामुळे आमचं व्हिजन क्लिअर होते. कार्यकर्ते संभ्रमात होते. त्यांना वाटायचं हे भाजपला उमेदवारी का नाही मागत.? त्यावेळी मी शांत होतो कारण आधीच माहिती होते की प्रतापराव जाधव हेच उमेदवार आहेत," असे आमदार संजय कुटे म्हणाले.

तसेच "मतदारसंघात भाजपने कोणताही सर्व्हे केला नाही, खासदार प्रतापराव जाधव नंबर एकवर होते आणि नंबर एकवरच राहतील असे ते म्हणाले. जिल्हयाच्या विकासासाठी प्रतापराव जाधवांचा मोठा वाटा आहे. खासदारांना देशासाठी काम करावं लागत, त्यामुळे त्यांना जिल्ह्यात जास्त फिरता येत नाही, मात्र तरीही जिल्ह्यात सर्वाधिक संपर्क असलेला नेता म्हणजे खासदार प्रतापराव जाधव आहेत," असेही संजय कुटे यावेळी म्हणाले.

दरम्यान, बुलढाण्यातून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय गायकवाड यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे. महायुतीमधील सभेत त्यांनी प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT