रूपाली बडवे साम टीव्ही, मुंबई
राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा (Maharashtra Politics) आता सुटला आहे. यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra Pawar Party) लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. याअगोदर शरद पवार गटाकडून दोन याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. (Maharashtra Lok sabha Election)
आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून उमेदवारांची अंतिम यादी होणार जाहीर आहे. सातारा, माढा आणि रावेर या जागेसाठी उद्या उमेदवारांची नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी, तसेच मुंबईतील काही जागांवरुन (NCP Sharadchandra Pawar Party 3rd List) वाद सुरू होता. परंतु काल शिवालय कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी 10 जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला,अमरावती, (Maharashtra Politics) नागपूर, भंडारा गोंदिया ,गडचिरोली चिमूर,चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर , रामटेक, उत्तर मुंबई अशा १७ जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. यापूर्वी कॉंग्रेसने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत. आज तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता (Lok Sabha Election 2024) आहे.
4 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची (Lok Sabha) दुसरी यादी जाहीर केली होती. भिवंडी आणि बीड या दोन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. बीडमधून बजरंग सोनवणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली (Maharashtra Election) आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP) लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे , नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं होतं. दुसऱ्या यादीमध्ये बीड आणि भिवंडीतील उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, सातारा, रावेर, माढा या लोकसभा (Sharad Pawar) मतदारसंघाबाबत अजून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.