Maharashtra Politics: 'वाघाची शेळी झाली', PM मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांची राज ठाकरेंवर टीका

Vijay Wadettiwar on Raj Thackeray: ''राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले, त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते'', असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
Vijay Wadettiwar on Raj Thackeray
Vijay Wadettiwar on Raj ThackeraySaam Tv

Vijay Wadettiwar on Raj Thackeray:

''राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले, त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते'', असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आज शिवतीर्थावर (Shivaji Park) मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार असं म्हणले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, ''वाघाची शेळी झाली. शेली गवत खाईल, असे राज ठाकरे यांचे भाजपमध्ये जाऊन होऊ नये. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात घातले का? राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार नाही. २०१९ त्यांनी मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली, आता त्यांना पाठिंबा दिला.'' (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vijay Wadettiwar on Raj Thackeray
Raj Thackeray: ...म्हणून उद्धव ठाकरे मोदींना विरोध करतात, राज ठाकरे यांनी सांगितलं कारण

यावर ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''समाधानकारक तोडगा निघाला नाही, म्हणून पाठिंब्याचे ढोल आज शिवतीर्थावर वाजले. पाठिंबा द्यायचा होता तर दिल्ली वारी करण्याची गरज काय पडली होती?'', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.  (Latest Marathi News)

'म्हणून पाठिंब्याचे ढोल आज शिवतीर्थावर वाजले'

ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''समाधानकारक तोडगा निघाला नाही, म्हणून पाठिंब्याचे ढोल आज शिवतीर्थावर वाजले. पाठिंबा द्यायचा होता तर दिल्ली वारी करण्याची गरज काय पडली होती?'', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Vijay Wadettiwar on Raj Thackeray
Raj Thackeray Speech: तर तेव्हाच मी शिवसेनाप्रमुख झालो असतो, राज ठाकरे स्पष्टच म्हणाले...

राज ठाकरे यांनी मोदींना पाठींबा जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहे की,''मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर त्यांची भूमिका जाहीर करत नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे,. मात्र राज ठाकरे यांच्या पाठिंब्याचा कोणताही परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com