Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे कुणाला मतदान करणार? भर पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं...,

Rohini Gudaghe

गिरीष कांबळे साम टीव्ही, मुंबई

राज्यात लोकसभा निवडणूकीचं वारं वाहत आहे. आज राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. माध्यमांशी संवाद साधतान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणूकीत कुणाला मतदान करणार हे स्पष्टच सांगितलं आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वर्षा गायकवाडला मी मतदान करणार आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भावना काय व्यक्त करायच्या? वर्षा गायकवाड यांना खासदार करून दिल्लीला पाठवणार आहे. देशात हुकूमशाही येता कामा नये. महाराष्ट्रामध्ये मविआ आणि देशात इंडिया आलीच पाहिजे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Lok Sabha Election 2024) म्हणाले की, मी वर्षा गायकवाड यांना मतदान करणार (Maharashtra Politics) आहे. पहिल्यांदा जरी हातावर मतदान करू तरी त्यांच्या हातात मशाल आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

देशामध्ये हुकुमशाही येता कामा नये. घटनेचं रक्षण झालं पाहिजे. वर्षा गायकवाड मुंबईच्या अध्यक्ष असल्यामुळे त्या कुठुनही लढु शकतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महायुतीबरोबर आघाडी ((Uddhav Thackeray News) अजून केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत काय सांगु शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी वर्षा गायकवाड यांना लोकसभेत पाठवणार असल्याचं (Uddhav Thackeray Voting Varsha Gaikwad) त्यांनी म्हटलं आहे. यावेळी हातानेच मशाल पकडली असल्याचं म्हटले आहे. त्याचा एकत्रित परिणाम झाल्यानंतर तुतारी फुंकू असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात (Maharashtra Election) महाआघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. महाविकास आघाडीने मुंबईच्या सहापैकी चार जागा ठाकरे गटाला तर दोन जागा या काँग्रेसला जाहीर केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walk After Meal: जेवणानंतर किती वेळ शतपावली करणं आरोग्यासाठी फायद्याचे?

Plate Served Method: जेवणाचे ताट वाढण्याचीही असते योग्य पद्धत, जाणून घ्या

Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

Today's Marathi News Live: जयंत पाटील ठरले 'शतकवीर', लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेतल्या १०० सभा

Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT