Buldhana Loksabha Constituency News:  Saamtv
लोकसभा २०२४

Buldhana Loksabha News: महायुतीत बंडखोरी? शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर; आता भाजपच्या माजी आमदारानेही भरला अर्ज

Maharashtra Politics News: भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बुलढाण्याच्या जागेवरुन महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १ एप्रिल २०२४

Buldhana Loksabha Constituency News:

बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र बुलढाण्यात पुन्हा एकदा बंडखोरी झाल्याचे दिसत असून भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बुलढाण्याच्या जागेवरुन महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता भाजपचे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजयराज शिंदे यांच्या अर्जामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, महायुतीमध्ये बंडाचे चिन्ह निर्माण झाली आहेत.

प्रतापराव जाधव यांच्याकडून भाजपाच्या आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर आणि भाजपा पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रभारी विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांना विश्वासात घेतले जात नाही, कार्यक्रमादरम्यान बॅनर वर त्यांचे कुठेही फोटो नाहीत, यामुळेच ही नाराजी असल्याचे विजयराज शिंदे यांनी बोलून दाखवले आहे.

या बंडखोरीनंतर भाजपा (BJP) पक्षश्रेष्ठी विजयराज शिंदे यांच्यासह भाजपाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, बुलढाण्यातून याआधी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गायकवाड यांनी माघार घेतली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT