sangli lok sabha constituency candidate  Saam tv
लोकसभा २०२४

Sangli Loksabha: आता निर्णय जनतेच्या कोर्टात.. सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; विशाल पाटील बंडाच्या तयारीत?

Sangli Loksabha Vishal Patil Vs Chandrahar Patil: सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवार मिळाल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील, तसेच आमदार विश्वजित कदम हे नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विजय पाटील

Sangli Loksabha Constituency News:

महाविकास आघाडीमधील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन वाद सुरू होता. आजच्या पत्रकार परिषदेत ही जागा ठाकरे गटाकडेच राहणार असून चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. मात्र सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवार मिळाल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील, तसेच आमदार विश्वजित कदम हे नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच सांगलीमधून काँग्रेसचे विशाल पाटीलही लढण्यास इच्छुक होते. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत याबाबत अंतिम निर्णय जाहीर झाला असून ही जागा ठाकरे गटाकडे गेली आहे.

अशातच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळताच काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील तसेच जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉटरिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर विशाल पाटील यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून आमचं काय चुकलं? आता लढायचं, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये नेमकं काय घडणार? विशाल पाटील बंड करण्याच्या तयारीत आहेत का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. आमदार विश्वजीत कदम, विशाल पाटील विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील या प्रमुख नेत्यांची उद्या होणार बैठक होणार आहे. या बैठकीतून कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटीलयांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Maharashtra Live News Update: आमदार गोपीचंद पडळकररांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर गंभीर टीका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगा प्रशिक्षकाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT