Balasaheb Thorat, Nana patole, Narendra Modi, Rahul Gandi, Saam Tv Digital News SAAM TV
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: 'मोदी सत्तेत येतील याचा २ दिवस आनंद घ्या' निवडणुकांच्या एक्झिट पोलवरुन काँग्रेसचा भाजपला टोला!

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. २ जून २०२४

लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष एनडीए आघाडीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे स्वप्न भंगणार आहे. परंतु राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र एक्झिट पोलचा दावा खोडून काढत इंडिया आघाडीचे सरकार येण्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"हा एक्झिट पोल आहे. निकाल येईल तेव्हा मोदी सरकार बदललेले दिसेल. 10 पैकी 8 लोक मोदींच्या विरोधात बोलताना दिसतात. 10 वर्षे जनतेने सरकारचा त्रास सहन केला. विकासाची निवडणूक हरतो आहे म्हणून धर्मावर नेली, एक्झिट पोलचे निकाल बदललेले दिसतील," असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

"काही कमी दाखवतात काही जास्त दाखवतात. आम्ही महाराष्ट्रात 35 च्या आसपास असू. कर्नाटकातही आम्ही पुढे राहू. मोदी सत्तेत येत आहेत याचा 2 दिवस आनंद घेत आहेत, 4 ला सगळे स्पष्ट होईल. एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांचे काम करतात. काही बरेही असतात,अनेकदा पोल चुकलेही आहे," असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.

"महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री हरतात तेव्हा आमचा आकडा 35 च्या वर जातोय. काही आकडे फुगवून दाखवले जातात नाहीतर नाराज होतात. अजित दादा यांना कुठेही रिस्पॉन्स नव्हता. यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाहीत. घर फोडणे, पक्ष फोडणे हा जो धुमाकूळ घातला त्याला लोक नाराज आहेत," अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT