सुरज मासूरकर, मुंबई|ता. २८ मार्च २०२४
राज्यातील महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरुन अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा केल्यानंतर आता रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)
याबाबत अधिक माहिती अशी की, रायगड लोकसभेच्या जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रायगडमध्ये सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे लोकसभेचे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला आता भाजपचा विरोध पाहायला मिळत आहे.
भाजपने (BJP) रायगड लोकसभा भारतीय जनता पक्षाने लढवण्यासाठी भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्याचबरोबर शेकापमधून भाजपमध्ये आलेले धैर्यशील पाटील ही नाराज असून भाजप पदाधिकाऱ्यांसह ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता सुनील तटकरींची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, नाशिकमध्येही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव चर्चेत आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने विरोध दर्शवला आहे. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र त्यांना डावलून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत पुन्हा यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.