Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : शिर्डीत महाविकास आघाडीला मोठा धक्का; या मोठ्या नेत्याने सोडली साथ?

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा आणि राज्य महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोला येथे आज रात्रीच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संचित बनसोडे

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा आणि राज्य महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोला येथे आज रात्रीच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्कर्षा रुपवते राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत आणि बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.

महाविकास आघाडीत शिर्डीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी उत्कर्षा रूपवते आग्रही होत्या. मात्र शिर्डीची जागा ठाकरे गटाकडे कायम राहिली. त्यामुळे रूपवते नाराज होत्या. काँग्रेसकडून वारंवार लोकसभेची उमेदवारी नाकारली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. उत्कर्षा रूपवते यांनी वंचितकडून उमेदवारी मिळाली तर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून शिर्डीची जागा शरद पवार गटाकडे गेली आहे. शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून सुजय विखे पाटील यांचं महाविकास आघाडीसमोर कडवं आव्हान असणार आहे. अशातच उत्कर्षा रूपवते यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसची साथ सोडल्यामुळे उडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भांडुप पश्चिम येथे स्टेशन प्लाझा इमारतीचा भाग कोसळला

Mumbai Hotels: युद्धाच्या भडक्यामुळे मुंबई गॅसवर, मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद

Lapwing Bird: टिटव्या स्वप्नात ओरडताना दिसणं शुभ की अशुभ? जाणून घ्या सत्य

राज्यातील बड्या IAS अधिकाऱ्याचे निलंबन मागे, अचानक निर्णय का बदलला?

वाजवा रे ढोल-ताशा, T20 वर्ल्ड कप जिंकून आलाय सूर्यादादा! टीम इंडियाच्या कर्णधाराचं मुंबईत जंगी स्वागत| Video Viral

SCROLL FOR NEXT