नरेंद्र मोदी आणि भाजपने ७५ वर्षांनंतर राजकीय नेत्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदीही दोन वर्षांनंतर ७५ वर्षांचे होत आहेत. ते जर आपल्या शब्दावर ठाम असतील तर दोन वर्षांनंतर त्यांनी निवृत्ती घेतली तर भाजपकडे दुसरा चेहरा नाही, मग भाजपचं काय होणार असा टोला उद्धव ठाकरे यांनी डोबिंवडीतील सभेतून लगावला आहे. महाविकास आघाडीचे कल्याण डोंबिवली लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारार्थ उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
४ जून नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत. कारण या निवडणुकीत बहुमताचा आकडा ते गाठू शकत नाहीत. नरेंद्र मोदींनी खूप काम केलं आहे. त्यांना आता थोडं आराम करू द्या, असंही ते मिश्किलपणे म्हणाले आहेत. मी पुन्हा येईन यावरून देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांना टोला लगावला आहे.
४ तारखेनंतर इंडिया आघाडीचं केंद्रात सरकार येणार आहे. त्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राची होणारी लूट थांबणार आहे. गुजरातला महाराष्ट्रातून नेलेले उद्योग परत आणणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी तळमळतोय, पण त्यांच्याकडे बघायला यांना वेळ नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी काही आश्वासनं दिलेत ती पूर्ण करणार आहे. नरेंद्र मोदी १० वर्ष सत्तेत आहेत. मात्र मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
तुम्ही मणिपूरमध्ये इतक्या घटना घडतायेत, मात्र पंतप्रधान तिकडे कधी गेले नाहीत. प्रफुल पटेल यांनी दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींना जिरेटोप घातला. मात्र प्रफुल पटेल यांना महाराष्ट्राची जनता कधीही विसरणार नाही. ४ जूनला जनता त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नसल्याचं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.