Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : काँग्रेस-शिवसेनेत पुन्हा वादाची शक्यता; सांगलीनंतर मुंबईतही ठाकरे गट देणार काँग्रेसच्या जागेवर उमेदवार?

Lok Sabha Election 2024 : एकीकडे सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत संघर्ष सुरू आहे. आता उत्तर मुंबईच्या जागेवरूनही वाद उफाळण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics 2024

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.एकीकडे सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या सहापैकी चार जागेवर शिवसेना आणि दोन जागेवर काँग्रेस उमेदवार देणार असं ठरलं होतं. मात्र, अद्यापही काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी आपला प्रचार देखील सुरू केल्याची माहिती आहे.

उत्तर मुंबईसाठी काँग्रेसकडे उमेदवार इच्छुक नसल्यामुळे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार उतरवणार असल्याचे समजते शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी आपला प्रचार देखील सुरू केला आहे. एकीकडे मुंबईच्या चार जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून यापूर्वीच चार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, मात्र काँग्रेसने अद्यापही आपले मुंबईतील उमेदवार जाहीर केले नसल्यामुळे उत्तर मुंबई जागेवर घोसाळकर यांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मतदारसंघातील पक्षाचे मतदान नेमके किती आहे याची चाचणी या माध्यमातून केली जाण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सांगली काँग्रेसचीच-विशाल पाटील

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे, तर ठाकरे गटाने उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठांशी भेट घेतली. या भेटीत मैत्रीपूर्ण लढतीविषयी देखील चर्चा केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आता सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीतील जनतेला पत्र लिहिलं आहे. 'सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार, असा दावा देखील विशाल पाटील यांनी पत्रातून केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT