Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : त्यावेळी वरून आदेश आला, पण नंतर..., अजित पवारांनी २०१९ च्या पहाटेच्या घटनेवर पुन्हा केलं भाष्य

Lok Sabha Election 2024 : 2019 मध्ये आम्ही बाहेरून पाठिंबा दिला आणि तेव्हा आम्हाला सांगितलं की सोबत जायचं आहे पण नंतर काय झालं माहीत नाही, असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं.

Sandeep Gawade

2019 मध्ये आम्ही बाहेरून पाठिंबा दिला आणि तेव्हा आम्हाला सांगितलं की सोबत जायचं आहे पण नंतर काय झालं माहीत नाही, आम्हाला वरून आदेश आला होता, मी सकाळी 5 वाजता पासून कामाला लागतो, असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं.

ज्या ज्या वेळी मोदींना भेटलो तेव्हा फक्त भारताचा विकास आणि आपला जगात पहिला नंबर कसा लागेल या गोष्टी सांगत असतात. मी 33 वर्षा पासून राजकारणात आहे , अनेकांना बघितल आहे. मी सर्व पंतप्रधानांची कारकीर्द बघितली आहे, म्हणून मी विकासाकडे जाणारा माणूस आहे. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ बहुजन मेळाव्यात ते बोलत होते. अमरावती जिल्हा संत महापुरुषांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात रोजगार व उदयोग आणण्याचा आमचा मानस आहे. जुने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व नवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं

देशात विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी यांना ओळखलं जातं. युक्रेनमध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा आपल्या देशातील अनेक मेडिकलचे विद्यार्थी तिथे अडकली होती. तेव्हा मोदींनी पुतीन यांना फोन केला आणि आपले मुलं इकडे परत येईपर्यंत युद्ध बंद राहत होतं.जगात 5 व्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आहे,आणि आता 3 ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था नेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मला शेतकऱ्यांची सुख दुःख कळतात,मी स्वतः शेती करतो , धान उत्पादक शेततरी जेव्हा अडचणीत आला तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली. सर्व मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहे. माझ्या देशातील एक देखील बांधव उपाशी झोपता कामा नये यासाठी राशन देण्याचं काम केलं. 3 कोटी लोकांना घर बांधून दिली. 300 युनिट पर्यंत वीज मोफत देणार आहे. सोलर मुळे शेतकऱ्यांना दिवसा पाणी मिळत आहे. मागे नवनीत राणा विरोधी पक्षाकडून निवडून आल्या होत्या आता त्या सत्ताधारी पक्षाकडून उभ्या आहे. बहुजन समाजातील माणसाला मदत व्हाव्ही, सत्ता येते जाते, सत्तेचा वापर लोकांना मदत करण्यासाठी झाला पाहिजे. विरोधकांपुढे खिचडी झाली आहे, असं टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT