Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : विरोधक अन् मित्र कसा असावा... यांच्याकडून शिका; अजित पवारांकडून विजय शिवतारेंचं तोंडभरून कौतुक

Lok Sabha Election 2024 : बारामतीच्या सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय शिवतारेंचं तोंडभरून कौतुक केलंय. विरोधक आणि मित्र कसा असावा हे विजय शिवतारेंकडून शिकावं असं अजित पवार म्हणालेत.

Sandeep Gawade

बारामतीच्या सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय शिवतारेंचं तोंडभरून कौतुक केलंय. विरोधक आणि मित्र कसा असावा हे विजय शिवतारेंकडून शिकावं असं अजित पवार म्हणालेत. दरम्यान विजय शिवतारेंसह बारामती मतदारसंघातील सर्वच विरोधकांना सोबत घेऊन अजितदादांनी शरद पवारांविरोधात मास्टर प्लॅन आखलाय. हा मास्टरप्लॅन काय आहे पाहुयात या रिपोर्टमधून.

2019 च्या विधानसभा निवडणुकीला सुरू झालेला हा प्रवास आज 2024च्या निवडणुकीपर्यंत पोहोचलाय.. अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या मैत्रीचा हा नाट्यमय प्रवास सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या वळणावर जुळलाय.. कधी काळी भर सभेतून शिवतारेंचा आवाका काढणाऱ्या अजित पवारांनी पुण्याच्या भरसभेत विजय शिवतारेंचं तोंडभरून कौतुक केलंय..

शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र नंतर त्यांनी माघार घेत सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सुरू केला. सासवडमध्ये त्यांनी त्यासाठी सभाही घेतली. त्यानंतर आज कुलदीप कोंडे यांना शिंदे गटात आणत अजितदादांना मोठा दिलासा दिलाय.

लोकसभेला सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याआधी विजय शिवतारेंनी 'पुरंदरचा तह' केला.. तहावर शिक्कमोर्तब करण्यासाठी खुद्द अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सासवडमध्ये उपस्थित राहिले..आता विजय शिवतारेंनी मैत्रीचा हात पकडून अजित पवारांना केलेल्या मदतीची परतफेड विधानसभा निवडणुकीत केली जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT