Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : 'महाराष्ट्र ही मर्दांची भूमी, पण...'; मराठीतून भाषण करत मल्लिकार्जुन खरगे यांनी अजित पवार, शिंदेंना डिवचलं

Lok Sabha Election 2024 : अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे आज मोंदीसमोर नतमस्तक होतात, मात्र महाराष्ट्र ही मर्दांची भूमी आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांनी आज धुळ्यातील सभेतून केली.

Sandeep Gawade

विरोधकांच्या मागे सरकारी यंत्रणा लावून नरेंद्र मोदीं नेहमी देशाला मजबूत करण्याची भाषा करतात. ईडीसारख्या संस्थेचा वावर करून विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याला सतवलं जात आहे. देशातील जवळपास ८०० नेत्यांना तुरुंगात टाकलं आहे. त्यामुळे ईडीचं संकट टाळण्यासाठी विरोधी पक्षातील नेते भाजपसोबत जात आहेत. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे आज मोंदीसमोर नतमस्तक होतात, मात्र महाराष्ट्र ही मर्दांची भूमी आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांनी आज धुळ्यातील सभेतून केली.

पहिल्या निवडणुकीत सांगितलं होतं, विदेशातील काळ धन देशात आणून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणार. 1 वर्षात देशातील युवकांना 2 करोड नोकऱ्या देणार होते. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणार होते. मात्र ना रोजगार मिळाले. ना शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं नाही,मोदींनी एलपीजी सिलेंडर 500 वरून 1200 वर नेलं, त्यामुळेच देशात पुन्हा परिवर्तन घडवायंच आहे.

नरेंद्र मोदी म्हणतात काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षात काय केलं? आम्ही जे केले त्यामुळेच तुम्ही प्रधानमंत्री झालात. देशाला इंदिरा गांधी यांच्यासारखा नेता हवा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे नेते हवे. आज देशात 800 नेत्यांना जेलमध्ये टाकलं आहे. ईडी, सीबीआय, आयटी सारख्या यंत्रणांचा चुकीचा वापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

देशात काही काही मोजके लोक श्रीमंत आहेत त्यांच्यावर कधी ईडीची धाड टाकली नाही. त्यांच्यावर धाड टाकण्याची हिंम्मत दाखवावी म्हणजे सत्य बाहेर येईल, कोणी कोणाला पैसे दिले. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार होत असताना नरेंद्र मोदींनी 13 देशांची यात्रा केली, पण मणिपूर मध्ये गेले नाहीत. राहुल गांधींनी मात्र मणिपूर मधून भारत जोडो न्याय यात्रा काढल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT