Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश; हेमंत गोडसेंच्या समर्थनात घोषणाबाजी

Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाला रामराम ठोकलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेचं निशाण हाती घेतलं आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics 2024

ठाकरे गटाला रामराम ठोकलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेचं निशाण हाती घेतलं आहे. पक्षप्रवेशावेळी नाशिकमधून लोकसभेसाठी इछुक असलेले हेमंत गोडसे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शिवसेनेत मी निष्ठेने काम केले, मात्र पक्षनिष्ठा ठेवूनही संपर्कप्रमुख पदावरून काढण्यात आलं. प्रामाणिक राहूनही माझ्यावर अन्याय करण्यात आला. मी विचारलं माझे पद का काढण्यात आलं, पण मला काहीही सांगण्यात आलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे. ते जी जबाबदारी देतील ती पार पाडणार आणि शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम करेन, असं बबनराव घोलप यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या संपर्क प्रमुख पदावरून हटविल्यानं घोलप नाराज होते. संपर्कप्रमुख पदावरून हटवल्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला होता. तसंच ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. बबन घोलप यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही भेट घेतली होती. घोलप हे पाच वेळेला विधानसभेवर निवडून गेलेत, समाजकल्याण मंत्रिपद सुद्धा त्यांनी भूषवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT