Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात शरद पवारांसारखा कसलेला मल्ल दंड थोपटून आव्हान देत आहे. वयाच्या 84 व्या वर्षीही शरद पवारांचा उत्साह तरुणाईला लाजवणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात पवारांनी सभांचा धडाका लावला आहे.

Sandeep Gawade

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात शरद पवारांसारखा कसलेला मल्ल दंड थोपटून आव्हान देत आहे. वयाच्या 84 व्या वर्षीही शरद पवारांचा उत्साह तरुणाईला लाजवणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात पवारांनी सभांचा धडाका लावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारण कमालीचे तापले आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी साखरपट्टा पिंजून काढला आहे. उद्धव ठाकरे यांनीही चांगलाच जोर लावला आहे. यानंतर महायुतीकडून सुद्धा थेट पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना साखर पट्ट्यात प्रचारासाठी उतरवण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी तितकी सुरु नव्हती. मात्र, तिसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्णतः साखर पट्टा असलेला आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर नव्हे तर सहकार क्षेत्रावरही ताबा मिळवून असलेल्या भागात निवडणुकीचा केंद्रबिंदू झाला आहे. महाविकास आघाडीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती येथे शरद पवारांनी सभा घेतल्या आहेत. अनेक ठिकाणी मोदींना जशास तसं उत्तर दिलं आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीने सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन शरद पवारांना बारामतीत अडकून ठेवण्याचा डाव आखला होता. मात्र पवारांनी तो हाणून पाडला. आक़डेवारीतच सांगायचं झालं तर शरद पवार हे मागच्या 48 दिवसातील केवळ 14 दिवसच बारामतीत थांबले. तब्बल 34 दिवस ते इतर जिल्ह्यात मविआच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. 22 दिवसांत पवार 50 सभा घेणार आहेत. उलट अजित पवार यांनी मागच्या 48 दिवसांतील तब्बल 40 दिवस बारामतीत तळ ठोकला आहे. केवळ 8 दिवस ते बारामतीच्या बाहेर होते.

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापूर, माढा, सोलापूर, सातारा आणि पुणे इथं सभा झाली आहे. सांगलीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची सभा झाली. योगी यांची इचलकरंजीमध्येही सभा पार पडली.

एक नजर टाकूया पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या संख्येवर...

पुणे - 19

सोलापूर - 39

सांगली - 17

सातारा- 15

कोल्हापूर - 19

या सर्व कारखान्यांचे राजकारण आणि सहकार जाळं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या चुलीपर्यंत आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्तित्व कायम ठेवण्यासाठी मविआ आणि महायुतीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. कोणाच्या वाटेला विजयाचा गोडवा येतोय ते पहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Maharashtra Live News Update: हार्बर मार्गावरील नेरूळ जुईनगर स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; पत्रात गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT