Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने नव्याने मतदानाची टक्केवारी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाल्याचं आयोगानं आधी जाहीर केलं होतं.

Sandeep Gawade

निवडणूक आयोगाने नव्याने मतदानाची टक्केवारी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाल्याचं आयोगानं आधी जाहीर केलं होतं. यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगानं नवीन आकडेवारी देत दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली. पाहुयात, यासंदर्भातला एक खास रिपोर्ट.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी संशयाच्या भोवऱ्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दुसरा टप्पा पार पडल्याच्या काही दिवसांनी निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी जाहीर केली. आधी जाहीर केलेली आकडेवारी आयोगाने बदलल्याने मोठा गोंधळ निर्माण झालाय.

दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाल्याची आयोगाने आधी जाहीर केलं होतं. यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगानं नवीन आकडेवारी देत दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली. त्यामुळे आयोगानं दिलेल्या माहितीत 5.75 टक्के फरक दिसून येतोय. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात आधी 54.34 टक्के मतदान जाहीर करण्यात आलं त्यानंतर 62.71 टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं.

मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली? आणि टक्केवारी जाहीर करण्यात इतका विलंब का झाला? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. विरोधकांनी याच मुद्यावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरलंय. 30 एप्रिलला मतदानाची टक्केवारी जाहीर केल्यानंतर तब्बल 10 दिवसांनंतर आयोगाने नव्याने आकडेवारी जाहीर

खरं तर मतदान किती टक्के होतं यावरही बरीच राजकीय गणितं अवलंबून असतात. कमी मतदान झाल्यास सत्ताधा-यांना फटका बसतो. त्यामुळे बदललेल्या आकडेवारीवरून स्वाभाविकच संशयाची सुई सत्ताधा-यांकडे वळलीय. सरकारनं यावर स्पष्टीकरण दिलं असलं तर विरोधकांच्या हाती टीकेची आयती संधी आलीय एव्हढं मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाने कहर; दादर स्थानक पाण्याखाली, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain : साखरझोपेत असताना घरावर दरड कोसळली, बापलेकीचा मृत्यू, आई-मुलगा गंभीर जखमी|VIDEO

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकलला लेट मार्क, प्रवाशांचा खोळंबा, पाहा व्हिडिओ

IAS Success Story: CA झाली, नंतर UPSC परीक्षेत मिळवली दुसरी रँक; वडिलांचे स्वप्न केले पूर्ण; IAS हर्षिता गोयल यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT