Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024: त्यांच्याकडे ना झेंडा ना अजेंडा; महाविकास आघाडीवर CM एकनाथ शिंदेंची बोचरी टीका

Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीत पक्षांकडे ना झेंडा आहे ना अजेंडा. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला स्वत: चा पक्ष वाचवता आलेला नाही. त्यांनी त्यांचे पक्ष सांभाळावेत, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics 2024

महाविकास आघाडीत पक्षांकडे ना झेंडा आहे ना अजेंडा. कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला स्वत: चा पक्ष वाचवता आलेला नाही. त्यांनी त्यांचे पक्ष सांभाळावेत, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर टीका केली. तसंच येत्या दोन दिवसात उर्वरीत जागावरील उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार असलेले राजू पारवे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसंच महायुतीतील नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारसभे सहभागी होणार आहेत. विदर्भातील सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डॉक्टरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यावर मुख्यमंत्री म्हणून आणि सरकार प्रयत्नशिल राहिलं. आपली आरोग्य यंत्रणा सुसज्ज असली पाहिजे. कितीही सरकारी रुग्णालये झाले तरी लोकसंख्येमुळे आपल्याला खाजगी रुग्णालयाची गरज आहे. तसंच ग्रीन हायड्रोजन ला प्रमोट करणारं आपलं पहिलं राज्य आहे. समृद्धीवरून आधी कोणी प्रवास करत नव्हतं आता चित्र बदललं आहे. कानेक्टिव्हिटी आवश्यक आहे, नागपुरात मेट्रोचे काम सुरू आहे.

विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज जगात देशाचं नाव आदराने घेतलं जातं. त्यामुळेच नरेंद्र मोदी जगात मोठी लोकप्रियता आहे. देशात गेल्या 10 वर्षात विकासाचं मोठं कार्य झालं आहे. मोदींना तिसऱ्यांदा पीएम बनवण्यासाठी महाराष्ट्रातून एक एक खासदार पाठवायचा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

Monalisa Wedding: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन केलं लग्न, कोण आहे तिचा नवरा? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT