Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : 'बंद दाराआड'च्या चर्चेची नवी स्क्रिप्ट? आदित्य मुख्यमंत्री, फडणवीस दिल्लीत अर्थमंत्री?

Lok Sabha Election 2024 : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांना दिल्लीत जायचं होतं, असा दावा ठाकरेंनंतर आता संजय राऊतांनीही केलाय. यावर आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्यास अजून परिपक्व नाहीत?, असा जोरदार पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

Sandeep Gawade

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांना दिल्लीत जायचं होतं, असा दावा ठाकरेंनंतर आता संजय राऊतांनीही केलाय. यावर आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्यास अजून परिपक्व नाहीत, असा जोरदार पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. , असा जोरदार पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. तर देवेंद्र फडणवीसांनी भानगडीत पडू नका असा सल्ला दिलाय. दरम्यान बंद दाराआडच्या चर्चेवरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपलेल्या लढतीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून.

उद्धव ठाकरेंनी बंद दाराआडच्या चर्चेचा आणखी एक किस्सा बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांना दिल्लीत अर्थमंत्री व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट ठाकरेंनी केलाय. तर उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झाल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केलाय. आदित्य ठाकरे यांच्या 'मुख्यमंत्रिपदा'वरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झ़डतायत. बाळासाहेबांच्या खोलीला कुठली तरी खोली असं म्हटल्यामुळे ठाकरेंनी फडणवीसांना चांगलंच सुनावलंय.

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर खालच्या पातळीवल टीका केली. त्याला 'जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल,' असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका, असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि राम कदम यांनी जोरदार पलटवार केलाय. अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा वाद आता आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन पोहचलाय. आता देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नवी स्क्रिप्ट लिहण्याच्या भानगडीत पडू नका असा इशारा दिलाय. मात्र बंद दाराआडच्या चर्चेचे अनेक पैलू समोर येतच राहणार हे मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT