Sharad Pawar and Uddhav Thackeray Saam TV
लोकसभा २०२४

Loksabha Election Result: पहिल्या कलांमध्ये पवार- ठाकरे जोरात! सांगलीत विशाल पाटलांची जोरदार मुसंडी; सातारा, माढ्यात काय स्थिती?

Maharashtra Loksabha Election Result: राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. सुरूवातीच्या कलामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

४ जून २०२४:

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातील मतमोजणी सुरू आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीचे कल समोर येत आहेत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पहिल्या कलांमध्ये महाविकास आघाडीसह शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे सुरूवातीचे कल समोर येत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी मुसंडी मारल्याचे दिसत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे, माढ्यात धैर्यशिल मोहिते पाटील, साताऱ्यात शशिकांत शिंदे, दिंडोरीत भास्कर भगरे यांनी आघाडी घेतली आहे.

तसेच शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईमधील उमेदवार अरविंद सावंत, हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील, शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी जोरदार आघाडी घेतली आहे. सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे, तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपतींनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पहिल्या मतमोजणीत ठाकरे- पवार पॅटर्न जोरात चालल्याचे दिसत आहे.

दरम्यान, बीडमध्ये पंकजा मुंडे, जालन्यामधून रावसाहेब दानवे, मुंबईमध्ये पियुष गोयल यांच्यासह श्रिकांत शिंदे , नागपुरमध्ये नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरेंनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीनेही बाजी मारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

SCROLL FOR NEXT