Ajit Pawar , NCP Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election Result : अजित पवार गटाचे 3 उमेदवार पिछाडीवर; शिंदे गटाचं काय?

Maharashtra lok sabha nivadnuk nikal 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. सुरूवातीच्या कलांमध्ये अजित पवार गटाचा रायगडमधील उमेदवार वगळता एकाही उमेदवाराला आघाडी घेता आलेली नाही.

Gangappa Pujari

४ जून २०२४:

राज्यातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. ४८ मतदार संघांमधील पहिले कल समोर येत आहेत. राज्यामध्ये पहिल्या काही तासांच्या मतमोजणीत महाविकास आघाडीने अनेक जागांवर जोरदार आघाडी घेतल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जादू फिकी पडल्याचे चित्र पहिल्या कलांमधून दिसत आहे.

शरद पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले अजित पवार यांचे चार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहेत. मात्र सुरूवातीच्या कलांमध्ये अजित पवार यांचा एकही उमेदवार आघाडीवर नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकसभेच्या रणसंग्रामात अजित पवार यांच्या घड्याळाची जादू फिकी पडल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार या सध्या पिछाडीवर आहेत. पहिल्या कलांमध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. तसेच शिरुरमध्येही राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत. आढळराव पाटील यांच्याविरोधात अमोल कोल्हे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.

धक्कादायक म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही रायगडमध्ये आघाडी मिळवता आली नव्हती. सुनील तटकरे यांच्याविरोधात अनंत गिते यांनी जोरदार आघाडी घेतली होती. पण जसजशी मतमोजणीची फेरी वाढत गेली, तसं चित्र पुन्हा बदललं. तटकरेंनी पुन्हा आघाडी घेतली. तर धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांना पिछाडीवर टाकत ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना शिंदे गटाने काही ठिकाणी जोरदार आघाडी घेतली आहे. श्रीकांत शिंदे, रविंद्र वायकर, राहुल शेवाळे, संदिपान भुमरे, हे उमेदवार आघाडीवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT