Jayant Patil 100 Sabha Record: Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Maharashtra NCP Chief Jayant Patil 100 Sabha Record: गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या. या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तब्बल १०० सभा घेत अनोखा विक्रम केला आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई, ता. १९ मे २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. काल राज्यातील पाचवा आणि अंतिम टप्प्याचा प्रचार संपला. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या. या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तब्बल १०० सभा घेत अनोखा विक्रम केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर नवा पक्ष घेऊन मैदानात उतरण्याचे मोठे आव्हान शरच पवार यांच्यासह पक्षातील नेत्यांसमोर होते. स्वतः शरद पवार यांनी लोकसभेच्या प्रचारात संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्यापाठोपाठ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही तब्बल १०० सभा घेण्याचा अनोखा विक्रम केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स हँडल्सवरून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात दिनांक ८ एप्रिल २०२४पासून (लोकसभा प्रचार सुरू झाल्यापासून) ते आजपर्यंतच्या सभांचे ठिकाण तारखेसह देण्यात आले आहे.

'लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज महाराष्ट्राच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराच्या शेवटी शंभर सभा पूर्ण केल्या. या शंभर सभा आदरणीय पवार साहेबांचे अस्सल नेतृत्व, त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि त्यांच्या प्रती असलेल्या निष्ठेला समर्पित. कितीही संकटे आली तरी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार अभेद्य, अविचल राहून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करेल.' अशी भावना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT