Ajit Pawar
Ajit Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024: अमोल मिटकरी, सुनील शेळके राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक; अजित पवार गटाकडून ३७ नेत्यांची नावे जाहीर

Pramod Subhash Jagtap

Star Campaigners List By Ajit Pawar:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरुन कलह सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सुपुर्त करण्यात आली आहे. (Maharashtra Lok Sabha Election 2024)

याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी निवडणुक आयोगाकडे देण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, यांंच्यासह ३७ नेत्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे याआधी शिवसेना शिंदे गटाने दिलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजप, राष्ट्रवादी या मित्रपक्षांची नावे होती. मात्र राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये मित्र पक्षांना स्थान देण्यात आले नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार, मावळचे आमदार सुनील शेळके, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, कृषीमंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर यादी नेत्यांची नावे या यादीमध्ये आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरुवातीपासून मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको, अशी टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आता यू टर्न घेण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांनी (Ajit Pawar) मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा, असा आदेश देत बारणे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे संकेत दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल: असदुद्दीन ओवेसी

KKR vs MI : मुंबईसमोर कोलकाताचं १६ षटकात १५८ धावांचं लक्ष्य; सामन्यात पावसाचा व्यत्यय

Jalna lok sabha: कोण होणार जालन्याच्या खासदार? भाजपाचा विजयी रथ काँग्रेस रोखणार?

Maharashtra Politics 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात फतवा'राज'; महायुतीसाठी राज ठाकरेंचा हिंदूंना फतवा

Kalyan News: कल्याणमध्ये भर रस्त्यावर गावठी कट्ट्यासह फिरत होता सराईत गुन्हेगार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT